अध्याय 1 / ५
व्रताची शिकवण
The vow is taught
नारद मुनी लोकांचे दुःख दूर करण्याचा उपाय विचारतात. भगवान विष्णू त्यांना सत्यनारायण व्रत सांगतात: आपल्या ऐपतीप्रमाणे पूजा करावी, कथा ऐकावी आणि प्रसाद सर्वांना वाटावा. या अध्यायात व्रताचा हेतू व साधी पद्धत येते.
English chapter guide
Narada asks how people facing hardship may find relief. Vishnu describes the Satyanarayan vow: worship with devotion, listen to the katha, offer prasad within one's means and share it. This opening chapter gives the purpose and basic observance of the vow.
मराठी पुस्तक · supplied book edition
हा मजकूर पुस्तकातून काढलेला आहे. अक्षर चुकू शकते. नेमका शब्द हवा असल्यास खालील छापील पान पाहा.
सत्यनारायण कथा प्रथमोध्यायः
श्लोक।। श्री गणेशाय नमः ।। एकदा नैमिषारण्ये ऋषयः शौनकादय : । पत्रच्छुर्मुयः सर्व सूतं पौराणिकं खलु ।।१।। ऋषय ऊचुः ।। व्रतेन तपसा किं वा प्राप्यते वांछितं फलम् ।। तत्सर्वं श्रोतुमिच्छामः कथयस्व महामुने ।।२।। सूत उवाच ।। नारदेनैव संपृष्टो भगवान् कमलापति : ।। सुर्षये यथैवाह तच्छृणुध्वं समाहिता : ।।३ ।। एकदा नारदो योगी परानुग्रहकांक्षया ।। पर्यटन् विविधान् लोकान् मर्त्यलोकमुपागतः ।।४ ।। ततो दृष्ट्वा जनान् सर्वात्नानाक्लेशसमन्वितान् ।। नानायोनिसमुत्पन्नान् क्लिश्यमानान् स्वकर्मभिः ।।५।। केनोपायेन चैतेषां दुःखनाशो भवेध्रुवम्।। इति संचित्य मनसा विष्णुलोकं गतस्तदा ।।६ ।।
पहिला अध्याय
श्लोकश्री गजाननाय नमः ।।
आता सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो. एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादिक ऋषीनी
पुराण सांगणाऱ्या सूतांना प्रश्न विचारला. (१) ऋषि विचारतात, "हे मुनिश्रेष्ठा, मनांतील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्यने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करुन सांगा". (२) सूत सांगतात, मुनीहो, नारदांनी हाच प्रश्न भगवान् महाविष्णूंना विचारला होता. त्या वेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो. (३) एकदा महायोगी नारदमुनी जनतेवर दया करावी अशा बुध्दीने लोकांत फिरत असतास मनुष्यलोकांत (भारतात) आले.(४) आणि मनुष्यलोकांत आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनिंमध्ये जन्म घेउन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत असे पाहून (५) कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील हा विचार करुन नारदमुनि वैकुंठ गेले.(६)
श्लोकतत्र नारायणं देवं शुक्लवर्ण चतुर्भुजम् ।। शंखचक्रगदापद्म वनमालाविभूषितम् ।।७।। दृष्ट्वा तं देवदेवेशं स्तोतुं समुपचक्रमे ।। नारद उवाच ।। नमो वाडूमनसातीत रुपायानंतशक्तये ।।८।। आदिमध्यांतहीनाय निर्गुणाय गुणात्मने ।। सर्वषामादिभूताय भक्तानामार्तिनाशिने ।।९।। श्रुत्वा स्तोत्रं ततो विष्णुर्नारदं प्रत्यभाषत ।। श्री भगवानुवाच ।। किमर्थमागतो ऽसि त्वं किं ते मनसि वर्तते ।। कथयस्व महाभाग तत्सर्वं कथयमि ते ।19 1। नारद उवाच ।। मर्त्यलोके जनाः सर्वे नानाक्लेशसमन्विताः ।। नानायोनिसमुत्पत्ना : पच्यन्ते पापकर्मभिः ।।११।। तत्कथं शमयेन्नाथ लघूपायेन तद्वद ।। श्रोतुमिच्छामि तत्सर्वं कृपाऽस्ति यदि ते मयि
1192| त्या वैकुंठात चार हातांत शंख, चक्र, गदा व कमळ धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या, स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्याची स्तुती करण्यास प्रारंभ केला.(७) नारद म्हणाले, "ज्याचे स्वरुप, वाणी व मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्त्तिमान् आहे, तो उत्पत्ती, मध्य व नाश रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी जो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो.(८)(९) नारदमुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान् विष्णू बोलले. भगवान् म्हणाले, "हे मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात ? तुमच्या मनात काय आहे ते मला सांगा. मी त्याचे
समर्पक उत्तर देईन. (१०) नारद म्हणाले, "हे भगवंता, मृत्युलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पाप-पुण्य कर्माप्रमाणे अनेक योंनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत. (११) आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व लोकांची दुःखे कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व सांगा." (१२)
श्लोक।। साधु पृष्टं त्वया वत्स लोकानुग्रहकांक्षया ।। यत्कृत्वा मुच्यते मोहात्तच्छृणुष्व वदामि ते ।।१३ ।। व्रतमस्ति महत्पुण्यं स्वर्गे मर्त्य च दुर्लभम् ।। तव स्नेहान्मया वत्स प्रकाशः कियतेऽधुना ।। १४ ।। सत्यनारायणस्यैवं व्रतं सम्यग्विधानतः । कृत्वा सद्यः सुखं भुंक्त्वा परत्र मोक्षमाप्जुयात् ।।१५।। तच्छुत्वा भगवद्वाक्यं नारदो मुनिरब्रवीत्।। नारद उवाच ।। कि फलं कि विधानं च कृतं केनैव तद्व्रतम् ।।१६।। तत्सर्व विस्तराद्बूहि कदा कार्य हि तद् व्रतम् ।। श्रीभगवानुवाच ।। दुःखशोकादिशमनं धनधान्यप्रवर्धनम् ।। १७।।
त्याचप्रमाणे हे व्रत कोणत्या काळी करावे तेही सांगा. हे नारदाचे भाषण ऐकून भगवान् म्हणाले, "हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारलास तो फार सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो. (१३) हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज तुला सांगतो. (१४) या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात. हे विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगुन शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो." (१५) भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारदमुनी म्हणाले, "हे नारायणा, या व्रताचे फल
काय, याचा विधी काय व हे व्रत पूर्वी कोणी केले होते. (१६) ते सर्व विस्तार करुन मला सांगा. "नारदा, हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे. (१७)
श्लोकसौभाग्यसंततिकरं सर्वत्र विजयप्रदम् ।। यस्मिन्कस्मिन्दिने मर्त्यो भक्तिश्रद्धासमन्वितः ।।१८।। सत्यनारायणं देवं यजेच्चैव निशामुखे ।। ब्र
म्हणैर्बान्धवैश्वैव सहितो धर्मतत्परः।।१९।। नैवेद्यं भक्तितो दद्यात्सपादं भक्ष्यमुत्तमम् ।। रंभाफलं घृतं क्षीरं गोधूमस्य च चूर्णकम्।।२०।। अभावे शालिचुर्ण वा शर्करां च गुड़ं तथा ।। सपादं सर्वभक्षणि चैकीकृत्य निवेदयेत् ।।२१।। विप्राय दक्षिणां दद्यात्कथां श्रुत्वा जनैः सह ।। ततश्च बंधुभि : सार्ध विप्रांश्च प्रतिभोजयेत् ।।२२।। सपादं भक्षयेद्भक्त्या नृत्यगीतादिकं चरेत् ।। ततश्च स्वगृहं गच्छेत् सत्यनारायणं स्मरन् ।।२३।। एवं कृते मनुष्याणां
श्लोकवांछासिध्दिर्भवेध्रुवम् ।। विशेषतः कलियुगे लघूपायोऽस्ति भूलते ।२४ ।।
तसेच सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे आहे. हे व्रत भक्ती व श्रध्दा यांनी युक्त होउन ब्राम्हण व बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोषकाळी (सुर्यास्तानंतर दोन तासांत) सत्यणारायणाचे पूजन करावे.(१८)(१९) केळी,दुध,शुध्द तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद (सव्वा पावशेर, सव्वा अच्छेर किवा सव्वा शेर असा करुन) भक्त्तियुक्त अंतःकरणाने सत्यणारायणाला अर्पण करावा. (२०) गव्हाचा रवा न मिळेल तर तांदुळाचा रवा घ्यावा. साखर न मिळेल तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तु सव्वा या प्रमानात एकत्र करुन त्यांचा केलेला प्रसाद सत्यणारायणाला अर्पण करावा. (२१) आपले बांधव व मित्र यांसह सत्यणारायणाची कथा
ऐकून ब्राम्हणाला दक्षिणा द्यावी. नंतर बांधव व ब्राम्हण यांसह भोजन करावे. (२२) नंतर भक्तने प्रसाद भक्षण करुन सत्यणारायणासमोर गायन व नृत्य करावे. हे पूजनादि, कृत्य पवित्र देवालयात करुन सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे.(२३) पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तभावाने हे व्रत केले असता मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशाचा एक सोपा उपाय आहे."(२४)
सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय या ठिकाणी पुरा झाला. हरये नमः।।

