Aarti · Shiva
Shiva Aarti — Lavthavti Vikrala
श्री शंकराची आरती
Marathi Shiva aarti from the same Ramdas tradition as Sukhakarta.
Samarth Ramdas · booklet page 16
Browser voice reading the displayed Devanagari; pronunciation depends on the installed voice
01
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । विषें कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकीं बाळा । तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा ॥
02
जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥
03
कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥ विभूतीचे उधळण शितिकंठ निळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥
04
देवीं दैत्यी सागरमंथन पै केले । त्यामाजी अवचित हलाहल उठिले ॥ ते त्वां असुरपणे प्राशन केले । नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥
05
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी । पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥ शतकोटीचे बीज वाचे उच्चारी । रघुकुलतिलक रामदास अंतरी ॥
Ask about this section
Shiva Aarti — Lavthavti Vikrala
Names the people and the event in this section, then says what the page does not include. It will not invent missing verses.